बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

अनुज्ञप्तीसाठी एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य

 


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): परिवहन विभागाने आधार क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन पध्दतीने शिकाऊ अनुज्ञप्ती देण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेमध्ये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेसमधून स्वयंचलितरित्या घेण्यात येतो. या प्रक्रियेअंतर्गत नमुना क्रमांक 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करतेवेळी ते प्रमाणपत्र केवळ एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांचे असावे, असे निर्देशित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली. 

नागरिकांचे काम फेसलेस होण्याकरिता एनआयसीव्दारे वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना 1(अ) अर्हता प्राप्त डॉक्टरांव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरून अपलोड करावयाचे आहे. त्यासाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टरांना या कार्यालयाव्दारे युझर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे अर्हता प्राप्त करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा.

कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स यांची एमबीबीएस पदवी. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे नोंदणी प्रमाणपत्र, क्लिनिकचे चार फोटो, ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट) हस्तलिखिल अर्ज व पासपोर्ट साईज चार फोटो इ. आवश्यक आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.