कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाराष्ट्र राज्य खादी
व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) 18 जून 2019 पासून
राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र व्यक्ती तसेच संस्थांकडून
योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवकांनी
तसेच संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी
डी.डी. कुरुंदवाडे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत
लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व
50 टक्के स्वगुंतवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष / छंद प्रशिक्षणाची
सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती
आदी संदर्भात माहिती दिली जाते.
योजनेंतर्गत
वैयक्तिक मधपाळ घटकासाठी अर्जदार हा साक्षर असावा, त्याची स्वत:ची शेती असल्यास
प्राधान्य असून वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. केंद्रचालक प्रगतशील मधपाळ या
घटकांतर्गत संबंधित व्यक्ती हा किमान 10 वी उत्तीर्ण असावा. त्याचे वय वर्षे 21
पेक्षा जास्त असावे. संबंधित व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील
कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत
जमीन असावी. लाभार्थ्याकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण
देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था या घटकांतर्गत संस्था
नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट
सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना
प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
लाभार्थी निवड
प्रकियेंतर्गत प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र
लिहून देणे अनिवार्य ठरेल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे
लाभार्थीस अनिवार्य राहील. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग
अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन,
कोल्हापूर, दूरध्वनी क्र. 0231-2651271 वर संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.