कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल
घटकांसाठी शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्याअनुषंगाने ऑटोरिक्षा
परवानाधारकांना 1500 रू. अनुदान देण्यात येत आहे. आज रोजी ज्या परवानाधारकांना
अनुदान मिळाले नाही त्यांच्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे
कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष परवानाधारकाने कागदपत्रे सादर करून अनुदानाचा लाभ
घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी केले आहे.
वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन मालकीची
अनुज्ञप्ती, वाहनाचा परवाना, आधार कार्ड, रद्द केलेला धनादेश/ बँक पासबुक
(ज्याच्यावर वाहनधारकाचे नाव असेल ज्याच्या आधार बँक खाते नंबर व आयएफएससी कोड
प्राप्त होईल.) इ. कागदपत्रे सादर करावीत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.