मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


 

कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामाध्ये कमीत-कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणासह उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात शिकत आहेत अशा तसेच सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या शैक्षणित वर्षात नमुद निकषानुसार उत्तीर्ण होऊन पुढील वर्षात शिकत आहेत तथापि या योजनेचा लाभ घेण्याकरिता अद्याप अर्ज सादर केला नसेल अशा माजी सैनिक/ दिवंगत माजी सैनिकाच्या पत्नीच्या/माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना संपूर्ण /उर्वरित कालावधीकरिता शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरिता संबंधित माजी सैनिक/दिवंगत माजी सैनिकाच्या पत्नी यांनी दि. 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

       15 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करण्याचे नियोजन असून नंतर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी मार्च 2022 मध्ये केली जाईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.