कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय):
मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबईव्दारे टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी /
कुटूंब निवृत्तीवेतनधाकांसाठी 49 वी पेंशन अदालत 28 सप्टेंबर रोजी 11 वा. मुख्य
पोस्टमास्तर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित
तक्रारी जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत/ ज्यांची सेवेत असताना मृत्यू झालेली
आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक ज्यांचे 3
महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतमध्ये विचार
केला जाईल.
पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर
मुद्द्यांसह प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी/ एमएसीपी
पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या प्रकरणांचा
विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या अर्जाच्या तीन प्रति लेखा अधिकारी/ सचिव पेंशन अदालत, मुख्य
पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई
-1 यांच्याकडे 31 ऑगस्ट रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रूपाने पाठवाव्यात. 31 ऑगस्ट
नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही. कोविड-19
महामारीच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पेंशन अदालतला प्रत्यक्ष उपस्थित राहणे
टाळावे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.