बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

नवीन रास्तभाव धान्य दुकानाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

 


 

                कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यामधील ग्रामीण भागात नवीन रास्तभाव धान्य दुकान देण्याकरिता सन 2021 सालचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. इच्छूक संस्थांनी / महिला बचत गटांनी/ स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहीत मुदतीत सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

पन्हाळा-  गुडे/सोमवार पेठ,  नावली, मौ. बहिरेवाडी, पिंपळे तर्फ सातवे, मौजे कोतोली व वारणा. कागल-  बोरवडे, माद्याळ  व पिंपळगाव खुर्द. करवीर-  शिरोली दुमाला,  येवती, खेबवडे व गर्जन, कळंबे तर्फ कळे, घानवडे, सोनतळी  व वसगडे. शाहुवाडी- मोळावडे, वडगाव, करंजोशी, ओकोली  व कोळगाव.आजरा- दाभिळ.गगनबावडा- पळसंबे, तळये बु. व खोकुर्ले अशा एकुण 26 गावांसाठी नवीन रास्तभाव धान्य दुकानांकरिता अर्ज करण्यासाठी  कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नवीन रास्तभाव धान्य दुकानाकरिता अर्ज करण्यासाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे-

संस्थांना अर्ज करण्यास मुदत-  दि. 20 सप्टेंबरपर्यंत. प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे- दि. 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर. नवीन दुकाने मंजुर करणे- दि. 21 ऑक्टोबर  ते 5 नोव्हेंबर 2021 असे आहे.

अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज करण्यासाठीच्या पात्रतेचे निकष व अटी शर्ती संबंधीत तहसिल कार्यालय, पंचायत समिती, गाव  चावडी व संबंधित ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.