कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय)
: आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3830 प्राप्त
अहवालापैकी 3676 अहवाल निगेटिव्ह तर 44 अहवाल पॉझिटिव्ह (110 अहवाल नाकारण्यात आले).
अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1630 प्राप्त अहवालापैकी 1518 अहवाल निगेटिव्ह तर 112
अहवाल पॉझिटिव्ह (323 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत). खासगी
रुग्णालये/लॅब मध्ये 13702 प्राप्त अहवालापैकी 13365 निगेटिव्ह तर 337 पॉझीटिव्ह
असे एकूण 493 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात
आज अखेर एकूण 1 लाख 98 हजार 183 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 87 हजार 331 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 5 हजार 295 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 493 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-12, भुदरगड-2, चंदगड-2,
गडहिंग्लज-7, गगनबावडा-0, हातकणंगले-61, कागल-33, करवीर-97, पन्हाळा-33, राधानगरी-7,
शाहूवाडी-30, शिरोळ-51, नगरपरिषद क्षेत्र-58, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-93, इतर
जिल्हा व राज्यातील-6 असा समावेश आहे.
आजअखेर
तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5309,
भुदरगड- 5076, चंदगड- 3851, गडहिंग्लज- 7294, गगनबावडा-718, हातकणंगले-22282,
कागल-7751, करवीर-30533, पन्हाळा-10454, राधानगरी-4936, शाहूवाडी-4721, शिरोळ- 12869,
नगरपरिषद क्षेत्र-21334, कोल्हापूर महापालिका 52 हजार 100 असे एकूण 1 लाख 89 हजार 304
आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 879 असे मिळून एकूण 1 लाख 98 हजार 183
रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील
एकूण 1 लाख 98 हजार 183 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 87 हजार 331 रूग्णांना
डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 557 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 5 हजार 295 इतकी आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.