कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील सर्व शासकीय, अशासकीय व
खाजगी उद्योग क्षेत्रातील आस्थापनांनी मतदार जागृती मंचाची स्थापना करुन त्यांच्या
आस्थापनेत एक नोडल अधिकारी नियुक्त करुन त्याची तपशीलवार माहिती dydeokolhapur@gmail.com या ई मेलवर सादर करावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
भारतीय
लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत
जास्त वाढावा या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सन 2009 पासून “स्वीप” SVEEP
(Systematic Voters' Education and Electoral Participation) कार्यक्रम हाती घेतला
आहे. सदर कार्यक्रमाचे फलस्वरुप गेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019, विधानसभा
निवडणूक 2019 व पदवीधर व शिक्षक व्दिवार्षिक निवडणूक 2020 मध्ये कोल्हापूर
जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान टक्केवारी नोंदवली गेली.
शासकीय, अशासकीय, कॉर्पोरेट व इतर संस्थामध्ये मतदार जागृती मंच
स्थापन करण्याबाबत निवडणूक आयोगाने निर्देशित केले आहे. मतदार नोंदणी व मतदान जनजागृती
करणे, मतदारांना मताचे मूल्य विषद करणे हे मतदार जागृती मंचाचे उद्दिष्ट असेल. या
मंचाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविल्यास, आस्थापनांतील सदस्यांमध्ये जनजागृती
होण्यास मदत होईल व आगामी निवडणूकीत निश्चितच त्यांचा सहभाग वाढेल. याबाबत अधिक
माहितीसाठी https://eci.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन
जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.