मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

डाक विभागाची 24 ऑगस्टला विशेष मोहीम

 

 


कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : डाक विभागामार्फत 1884 पासून ‘डाक जीवन विमा’ (पीएलआय) ही सुविधा सुरु झाली असून सद्या 137 वर्षे पूर्ण करीत आहे. कमी प्रीमीयम अधिक बोनस, प्राप्तीकरातून सुट, पहिल्या हप्त्याचा आगाऊ भरणा, पासबुक, परिवर्तन, पुनरुज्जीवन ही या विम्याची वैशिष्ट्ये आहेत. सद्याच्या डिजीटल युगामध्ये एसएमएस/ ई-मेल/ ऑनलाईन पेमेंट या सेवाही सुरु करण्यात आल्या आहेत.

सुरुवातील फक्त टपाल खात्यापुरती मर्यादित असणारी ही योजना आज सर्व केंद्र व राज्य सरकारी, शासकीय, निम शासकीय कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, सल्लागार, पदवीधर तसेच राष्ट्रीय शेअर बाजार, अनुसूचित कंपन्या यातील कर्मचारी यांनादेखील उपलब्ध आहे. ही माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कोल्हापूर डाक विभागामार्फत 24 ऑगस्ट रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील प्रत्येकाने 24 ऑगस्ट रोजी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांनी केले आहे.   

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.