कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : सध्या कोरोना आणि
महापूरामुळे राज्यापुढील आर्थिक संकटात भर पडली आहे. मात्र याही परिस्थितीत सरकार
खंबीर आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या आर्थिक प्रश्नासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार
यांना लवकरच भेटून तोडगा काढू अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी
दिली.
इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील
विविध अडचणीबाबत मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक
आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा प्रशासन
अधिकारी हेमंत निकम, नगरपालिका मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सध्या सरकारकडेही
आर्थिक चणचण जाणवते आहे. इचलकरंजी शहराचे प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने
सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहू तर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्ह्यातील
सर्व नगरपालिकांचे प्रश्न एकत्रित स्वरुपात द्यावेत अशी सूचना केली.
तत्पूर्वी इचलकरंजी नगरपालिकेची
आर्थिक स्थिती नाजूक असून नगरपालिकेला नेहमीप्रमाणे मिळणारे अनुदान नियमित आणि
लवकर मिळावे यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर केल्याची माहिती न. पा.
मुख्याधिकारी ठेंगल यांनी दिली. याप्रसंगी
न. पा. लेखापाल कलावती मिसाळ, प्रशासनधिकारी नम्रता गुरसाळे, कामगार अधिकारी विजय
राजापूरे, कर अधिकारी आरिफा नूलकर आदी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.