रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे १३ हजार डोस उपलब्ध

 

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) :  कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे सुमारे १३ हजार डोस उपलब्ध झाले असून यातील १ हजार ४०० लस दिव्यांगांना देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा -  ४४०, भुदरगड - ४६० , चंदगड - ६५० , गडहिंग्लज -  ८५०, गगनबावडा -००, हातकणंगले - २ हजार ५२०, कागल - ७००, करवीर - १ हजार ३५० , पन्हाळा - ६८०, राधानगरी - ७००, शाहूवाडी - ५५०  तर  शिरोळ तालुक्यासाठी १ हजार १५० डोस प्राप्त झाले आहेत.

सीपीआर रूग्णालयासाठी १५० , सेवा रूग्णालय, (कसबा बावडा ) ०० तर कोल्हापूर महानगरपालिका १ हजार ४०० असे एकूण ११ हजार ६०० डोस प्राप्त झाले आहेत.

          ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे. गगनबावडा तालुका व सेवा रुग्णालयासाठी ( कसबा बावडा ) या वेळेला लसीचा एकही डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये. संबंधितांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे .

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.