कोल्हापूर,
दि. १०: (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोना संकटामुळे यावर्षी
सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत
आहेत. यावर्षीचा मोहरम सण ही साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे, कोविड १९ मुळे
उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता हा सण साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक
सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
१) मोहरम महिन्याच्या ९ व्या दिवशी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी "कत्ल की
रात" तसेच दुसऱ्या दिवशी
“योम-ए-आशुरा " येत असून त्या निमित्ताने
मातम मिरवणूका काढण्यात
येतात ,परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे
सार्वजनिक मातम मिरवणूका काढता येणार नाहीत.
२) मातम मिरवणूक-कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे
आपापल्या घरात राहूनच
मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा.केंद्र व राज्य शासना कडून सामाजिक आणि
धार्मिक कार्यक्रमांना बंदी
असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही.खाजगी मातम
देखील शासनाच्या
नियमांचे पालन करुन घरीच करावेत.सोसायटीमधील नागरिकांना देखील एकत्रित
मातम/दुखवटा करु नये .
३) वाझ/मजलीस- हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने
आयोजित करण्यात यावेत.
४) ताजिया/आलम- ताजिया/आलम काढू नयेत.
५) सबील/छबील- सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी
घ्यावी.त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत
पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच
पाण्याचे वाटप करण्यात यावे.सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे
नियम (मास्क,सॅनिटायझर इ.)
पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
६) कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन
आरोग्य,पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका,पोलीस,स्थानिक
प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे
बंधनकारक राहील.तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सण सुरु
होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील
अनुपालन करावे असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.