पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली रुई-इंगळी
बंधाऱ्याची पाहणी
कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील पूरबाधित
नागरिकांना यापुढे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित
विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन उपाययोजना राबविण्यासाठीचा 'ऍक्शन प्लॅन'
तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
पालकमंत्री सतेज
पाटील यांनी आज करवीर तालुक्यातील पूरबाधित गावांना भेटी दिल्या. यानंतर हातकणंगले
तालुक्यातील रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी केली.यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी
खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, मुरलीधर
जाधव, तहसीलदार शरद पाटील, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज
पाटील म्हणाले, पूरबाधितांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
सध्या प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत
आहे. यानंतर पूरबाधितांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार
असून यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे. भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होवू
नये, यासाठी बैठक घेऊन ठोस उपाययोजनांबाबत चर्चा करुन कृती आराखडा तयार केला जाईल.
यात ग्रामस्थांच्या सूचनांचा विचार केला जाईल.
रुई-इंगळी बंधाऱ्याबरोबरच नदी, ओढ्यावरील भरावामुळे नदीच्या प्रवाहाला
अडथळा निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजना करणे, ओढ्यावरील व नदीपात्रातील
अतिक्रमणे काढणे, गाळ व राडारोडा काढणे, गावांचे पुनर्वसन करणे, पुररेषा निश्चित
करुन नद्यांचे रुंदीकरण आदी उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत बैठकीत चर्चा
करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार राजूबाबा
आवळे, माजी खासदार निवेदिता माने व उपस्थित मान्यवरांनी करवीर, हातकणंगले
तालुक्यातील पुरपरिस्थिती निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देऊन लवकरात
लवकर प्रयत्न करण्याबाबत चर्चा केली.
तहसीलदार शरद पाटील
यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.