कोल्हापूर दि. ४ : कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या शालेय पटपडताळणी तपासणी मोहिमेची जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज पाहण केली. त्यांनी करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली आणि इस्पुर्ली गावातील अनुक्रमे ईश्वरा वाडकर हायस्कूल, ज्ञानसागर भैरवनाथ विद्यालय आणि जयहनुमान हायस्कूल व बाळकृष्ण वडेर ज्युनिअर कॉलेजमधील पटपडताळणीची पाहणी केली.
श्री. देशमुख यांनी आज या तीनही शाळांत भेट देऊन पटपडताळणीची पाहणी केली. त्यांनी मुलांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यात आली आहे का? याची पाहणी केली. त्यांनी मुलांच्या वह्या आणि पुस्तके पाहिली. पुस्तकावरील नावही पाहिले.
पटपडताळणीबरोबरच त्यांनी शाळांत असलेल्या भौतिक सुविधांची पाहणी केली. शाळात दिल्या जाणार्या पोषण आहारांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. दरम्यान, पटपडताळणी मोहिमेच्या आजच्या दुसर्या दिवशी सुमारे १२०० हून अधिक शाळांची पटपडताळणी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.