कोल्हापूर दि. ११ : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या पदाधिकार्यांनी धार्मिक स्थळांमधील दागिन्यांची, मौल्यवान वस्तुंची, मोठा खजिना, जडजवाहीर, दानपेटी इत्यादी वस्तू असतील अशा ठिकाणी सशस्त्र सुरक्षा रक्षक यांची दिवसा व रात्री नेमणूक करावी. शिवाय रात्रीची प्रतिमा मिळेल अशाप्रकारे सीसीटीव्ही/नाईट व्हीजन कॅमेर्यांची व्यवस्था करावी. धार्मिक स्थळातील मूर्ती, दागदागिने ठेवण्याच्या जागा व दान पेटी यावर योग्य प्रकाश योजना ठेवावी, असे धर्मादाय सह आयुक्त, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.