मुंबई दि. १२ : कोल्हापुरच्या कागल तालुक्यातील जैनाळ गावचे गावकरी उत्सुकतेने गावातल्या काळम्मादेवी मंदिराच्या ओसरीवर जमले होते. निमित्त होतं राज्याच्या ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव सुधीर ठाकरे यांच्या जय महाराष्ट्र या दूरदर्शनवरील मुलाखतीचे.
ग्राम विकास प्रधान सचिव श्री. ठाकरे यांच्या या ओसरीवरच्या ग्राम विकास गप्पांच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण जय महाराष्ट्र कार्यक्रमामधून आज गुरुवार दि. १३ ऑक्टोबर २०११ रोजी रात्रौ ८ ते ९ या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्गि वाहिनीवर होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिलींद बांदिवडेकर यांनी केले आहे. जैनाळ गावाबरोबरच करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावात ध्वनिचित्रमुद्गीत झालेल्या या जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या भागात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, गट विकास अधिकारी ओमप्रकाश गहाणे, सौ. रश्मी कुलकर्णी तसेच सरपंच, ग्रामस्थ यांचे अनुभवांचे कथन या कार्यक्रमामध्ये पहावयास मिळेल.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक विजय नाहटा, माहिती संचालक श्रध्दा बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जय महाराष्ट्र चमूने कोल्हापूर जिल्ह्यात या मुलाखतीचे बाह्यचित्रीकरण करुन हा जय महाराष्ट्र कार्यक्रमाचा आगळावेगळा भाग तयार केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.