कोल्हापूर दि.१४ : महाराष्ट्र राज्याचे उद्योग, बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री नारायण राणे १५ ऑक्टोबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एसएसपीएम कॉलेज, कणकवली जि. ंिसंधुदुर्ग येथील हेलीपॅडवर आगमन व खाजगी हेलीकॉप्टरने कोल्हापूरकडे प्रयाण. १०-३० वाजता डॉ. डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेज, कोल्हापूर येथील हेलीपॅडवर आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. ११ वाजता हॉटेल रेसिडन्सी क्लब, कोल्हापूर येथे स्टार माझा या वृत्तवाहिनीतर्फे आयोजित माझा महाराष्ट्र २०२० या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी राखीव. २ वाजता खाजगी हेलिकॉप्टरने वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्गकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.