कोल्हापूर दि. १३ : सीपीआर रुग्णालयातील कोणत्याही वैद्यकीय अधिकारी संघटनेने काम बंद केलेले नसून रुग्णसेवा सुरळीतपणे व नियमितपणे सुरु आहे, असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. पी. परचंड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
सीपीआर रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग सुरळीतपणे सुरु असून कोणताही विभाग बंद नाही. सीपीआरमध्ये आरोग्य सेवेअंतर्गत कोणीही वैद्यकीय अधिकारी कार्यरत नसल्यामुळे डॉक्टरांचे काम बंदमध्ये सीपीआर रुग्णालयाचा संबंध नाही असेही डॉ. एम. पी. परचंड यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.