कोल्हापूर दि. १३ : शासकीय तंत्रनिकेतन, विद्यानगर, जुना पुणे-बेंगलोर रोड, कोल्हापूर येथील संस्था व वसतिगृह परिसरातील एकूण २६ एकरातील गवताचा लिलाव निविदा पध्दतीने करण्यात येणार आहे. निविदा फॉर्म संस्थेत विक्रीस उपलब्ध असून इच्छुक व्यक्तींनी २४ ऑक्टोबर २०११ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा पाठवाव्यात. गवत लिलावाची अपेक्षित कमीत कमी किंमत १९ हजार रुपये अधिक २० टक्के लोकल सेस फंड इतकी आहे. गवत लिलावाच्या अटी व शर्ती संस्थेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पहावयास मिळतील. प्राप्त निविदा २५ ऑक्टोबर २०११ रोजी दुपारी १२ वाजता उघडण्यात येतील. निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार प्र. प्राचार्य यांनी राखून ठेवले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.