बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

शासकीय मुद्गणालयात शिकाऊ उमेदवार भरती

       कोल्हापूर दि. ५ : शासकीय मुद्गणालय व लेखन सामग्री भांडार, कोल्हापूरकडील मुद्गणालयामध्ये शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे. पुस्तक बांधणीसाठी ६ पदे भरण्यात येणार असून इयत्ता आठवी उत्तीर्ण तर प्लेट मेकिंगचे १ पद असून इयत्ता दहावी उर्त्तीण अशी शैक्षणिक अर्हता आहे. दोन्ही पदांसाठी शिकाऊ उमेदवारी कालावधीत २ वर्षाचा असून प्रथम वर्षासाठी १४९०/- व दुसर्‍या वर्षासाठी१७०० रुपयेअसेमासिकमानधन देण्यात येईल.                                                                              
      इच्छुक उमेदवारांनी अर्जासह १० ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय मुद्गणालय व लेखन सामग्री भांडार, कोल्हापूर येथे उपस्थित रहावे असे व्यवस्थापकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.