सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

बंदी दत्तात्रय हरी जाधव यांच्या मृत्युची दंडाधिकारी चौकशी सुरु

    कोल्हापूर दि. १० :  मध्यवर्ती कारागृह, कळंबा कोल्हापूर येथे शिक्षा भोगत असलेला बंदी दत्तात्रय हरी जाधव (बंदी क्रमांक सी-३३२४) यांचा २५ जुलै २०११ रोजी मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
      या दंडाधिकारी चौकशीसाठी राधानगरीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली असून या बंदीच्या मृत्युबाबत कोणास काही माहिती, पुरावा, तक्रार आदी नोंदवायची असेल त्यांनी १७ ऑक्टोबर २०११ रोजी किंवा तत्पूर्वी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, राधानगरी विभाग, कोल्हापूर यांच्याकडे समक्ष आणून द्याव्यात. या तारखेनंतर येणार्‍या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. माहिती, पुरावा, तक्रार करणार्‍या व्यक्तीची तशी इच्छा असल्यास  नांव गुप्त  ठेवण्यात येईल, असे उपविभागीय दंडाधिकारी, राधानगरी विभाग, कोल्हापूर यांनी स्पष्ट केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.