कोल्हापूर दि. १४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील दि. ७ ऑक्टोबर २०११ च्या शासन पत्रानुसार आगामी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका माहे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ साठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे नवीन नमुन्यातील अर्ज दि. २० ऑक्टोबर २०११ अखेर वाढीव मुदतीत संबंधित तहसिल कार्यालयात आवश्यक सर्व कागदपत्रांसह दाखल करावेत असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका माहे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ मध्ये होणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील दि. १७ जुलै २००९ च्या शासन निर्णयानुसार या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे अर्ज दि. ३० जुलै २०११ अखेर संबंधित तहसिल कार्यालयात दाखल करण्याबाबत कळविण्यात आले होते. दरम्यान दि. १० जुलै २०११ च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील पत्रासोबत प्राप्त निवडणुकीसाठी जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी नव्याने विहित केलेल्या अर्जांतील प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकार्यांना दि. १६ सप्टेंबर २०११ रोजीच्या आदेशाद्वारे प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार तहसिल कार्यालयास दि. ३० जुलै २०११ अखेर प्राप्त व प्रलंबित जात प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे अर्ज त्यासोबत आवश्यक रहिवासाबाबतची कागदपत्रे, पुरावा आहेत याची खात्री करुन परिपूर्ण प्रस्ताव प्रमाणपत्रावर स्वाक्षरीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करुन स्वाक्षरीअंती असे प्रस्ताव अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर यांच्याकडे पोहोच करावेत असे संबधित तहसिलदारांना कळविण्यात आले आहे. सबब ज्या इच्छुक उमेदवारांनी १० जुलै २०११ च्या पत्रासोबत प्राप्त जाती प्रमाणपत्र पडताळणी सुधारित अर्ज दाखल केले नसतील अशा उमेदवारांनी सुधारित अर्ज संबंधित तहसिल कार्यालय येथे दाखल करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.