कोल्हापूर दि. १४ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत गगनबावडा तालुक्यात २ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०११ कालावधीत कुष्ठरोग जनजागरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गगनबावडा तालुक्यातील ११ माध्यमिक शाळांमधील ३५३७ विद्यार्थी व पालकांना कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती देण्यात आली.
कोल्हापूरचे आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहाय्यक संचालक डॉ. सुदर्शन पाटील यांनी कुष्ठरोग जंतूपासून होत असून इतर रोगांप्रमाणे औषधोपचाराने तो पूर्णपणे बरा होत असल्याची शास्त्रीय माहिती या जनजागरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी दिली. तिसंगी येथील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या जनजागरण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य भगवान पाटील व मुख्याध्यापक एम. ए. शिंदे प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूरच्या वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाच्या सौजन्याने कुष्ठरोग जनजागरण कार्यक्रम राबविण्यात आला. या जनजागरण मोहिमेत कुष्ठतंत्रज्ञ बी. ए. मधाळे, ए. एम. कांबळे, व्ही. बी. पाटील, ए. एन. शास्त्री, डी. ए. जांभळे, एस. डी. चोपडे यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.