बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

अजिंक्यतारा गॅस सर्व्हिसेस कंपनीचा राजीनामा इण्डेन कंपनीकडून नवीन गॅस वितरकांची नेमणूक

       कोल्हापूर दि. ५ : इंण्डेन कंपनीच्या अजिंक्यतारा गॅस सर्व्हिसेस कोल्हापूर यांनी ३० सप्टेंबर २०११ रोजी राजीनामा दिला आहे. या एजन्सीच्या गॅस ग्राहकांना सिलेंडर सेवा पुरविण्यासाठी कंपनीकडून क्षिरसागर गॅस एजन्सी, राजेंद्ग नगर व गजानन इण्डेन, ताराबाई पार्क या वितरकांना खालीलप्रमाणे विभाग जोडण्यात आले असून संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.
      क्षिरसागर गॅस एजन्सीकडे जोडण्यात आलेले विभाग पुढीलप्रमाणे - मंगळवार पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ, जवाहरनगर, सुभाषनगर, आयसोलेशन वॉर्ड, शिवाजी पेठ, कळंबा, आपटेनगर, लक्ष्मीपुरी, वाय. पी. पोवार नगर, उद्यमनगर, गुरुवार पेठ, फुलेवाडी, जयप्रभा स्टुडिओ, गंगावेश, रंकाळा, उत्तरेश्वर पेठ, लक्षतीर्थ. गॅस ग्राहकांनी घरपोच सेवा मिळण्यासाठी ०२३१- २६९२१३१/२६९४३३४ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी.
      गजानन इंण्डेन गॅस एजन्सीकडे जोडण्यात आलेले विभाग पुढीलप्रमाणे - शाहूपुरी, कमला कॉलेज, टाकाळा, स्पाईक्स एरिया, सी. बी. एस. स्टँड, शिवाजी पार्क, सी. पी. आर. एरिया, राजारामपुरी, अकबर मोहोल्ला, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, जोशी गल्ली, सिध्दार्थनगर, तोरस्कर चौक. गॅस ग्राहकांनी घरपोच सेवा मिळण्यासाठी ०२३१-२२००२५० या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.