कोल्हापूर दि. ५ : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हे रविवार दि. ९ ऑक्टोबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. ९ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ७-२० वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे आगमन व यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूरकडे प्रयाण व राखीव. दुपारी २-३० वाजता कोल्हापूरहून शासकीय वाहनाने निपाणीकडे प्रयाण व श्री चंद्गप्रभू अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास उपस्थिती. ४ वाजता निपाणीहून शासकीय वाहनाने कोल्हापूरकडे प्रयाण.
दि. १० ऑक्टोबर रोजी एन. आय. ए. एम. कोल्हापूरच्या शेतकरी जनजागृती कार्यक्रमाच्या समारोप समारंभास उपस्थिती.
दि. ११ ते १४ ऑक्टोबर २०११ पर्यंत स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.
दि. १५ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ९ वाजता स्टार माझाचे मुख्य संपादक श्री. राजीव खांडेकर यांनी आमंत्रित केलेल्या माझा महाराष्ट्र २०२० या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. ११-३५ वाजता कोल्हापुरहून किंगफिशर विमानाने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.