कोल्हापूर दि. १३ : कोल्हापूर जिल्ह्रयातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उदा. महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचाय समित्या, ग्रामपंचायत इत्यादी मधील आरक्षीत
असलेल्या प्रभागात निवडणूक लढवू इच्छिणार्या मागासवर्गीय उमेदवारांच्या जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव ५ ऑक्टोबर २०११ पर्यंत स्विकारणे बाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या. तथापि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील ७ ऑक्टोबर २०११ रोजीच्या पत्रान्वये ३१ डिसेंबर २०११ अखेर होणार्या निवडणुकांकरिता राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारांचे प्रस्ताव स्विकारण्याची मुदत २० ऑक्टोबर २०११ पर्यत वाढविण्यात आलेली आहे असे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.