कोल्हापूर दि. १३ : बलभीम बँकेचे अपना बँकेत विलीनीकरण झाल्याने तसेच अपना बँक निवृत्त वेतन वितरित करण्याबाबत शासन यादीत समाविष्ट नसल्याने बलभीम बँकेतून निवृत्त वेतन घेणार्या सर्व निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडावे. संबंधितांनी निवृत्ती वेतन वर्ग करण्याविषयीचा अर्ज जिल्हा कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन विभागात २५ ऑक्टोबर २०११ पर्यंत द्यावा. अर्जासोबत नवीन राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडावी. अन्यथा माहे ऑक्टोबर २०११ चे निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्ती वेतन अदा करण्यात अडचण येणार असल्याचे अप्पर कोषागार अधिकारी, कोल्हापूर यांनी स्पष्ट केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.