कोल्हापूर दि. १३ : महाराष्ट्राचे कामगार व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ दि. १४ ऑक्टोबर २०११ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. १४ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ७ वाजता मुंबईहून कोल्हापूर रेल्वेस्थानक येथे आगमन व मोटारीने कागलकडे प्रयाण. ७-३० ते १० वाजेपर्यत कागल येथे आगमन व कागल निवासस्थानी गाठीभेटी. दुपारी २ वाजता कागल येथील शाहूनगर वाचनालयामध्ये कागल तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. सायं. ४ वाजता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सेवक संघ यांच्यावतीने आयोजित चषक प्रदान कार्यक्रमास उपस्थिती. ६ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पंकज खलिफ, ताजुद्दीन शेख, श्री. मिरजकर यांच्यासमवेत चर्चा व सोयीनुसार निवासस्थानाकडे प्रयाण.
दि. १५ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ११-३० वाजेपर्यत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. १२ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे किसान मका प्रक्रिया संघ कर्मचारी यांचेसमवेत चर्चा. १-१५ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेच्या प्रश्नांबाबत चर्चा. २ वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे धामणी ता. आजरा येथील विकास कामांबाबत चर्चा. ४ वाजता सिंचन भवन, कोल्हापूर येथे महेश गुरव, प्रत्यूश जैन, वंदूरे पाटील व श्री. खोडे यांचे समवेत चर्चा व सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण.
दि. १६ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते १० वाजेपर्यत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ वाजता सिध्दनेर्ली येथील विविध विकास कमांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. १-३० वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सायं ५ वाजता साके येथील विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. ५ वाजता गोकूळ शिरगाव येथे गोकूळ शिरगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती व सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण.
दि.१७ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ९-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथे संत तुकाराम महाराज अभंग स्पर्धा कार्यक्रमास उपस्थिती. ११ ते २ वाजेपर्यत कागल येथे न्यायालयीन कामकाजासंदर्भात राखीव. ४ वाजता जयसिंगपूर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. ५ वाजता कुरुंदवाड येथील नगरपरिषद विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. ७ ते ८ वाजेपर्यत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे राखीव रात्रौ ८-३० वाजता कोल्हापूर येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.