कोल्हापूर दि. ७ : युध्द विधवांचे पाल्य, आजी/माजी सैनिकांचे पाल्य, सख्खे भाऊ, अविवाहित शहीद जवानांचे सख्ख्ये भाऊ, मुलगा नसल्यास शहीद जवानांचे जावई (दत्तक मुलीच्या पतीसह) तसेच राज्य/राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू यांच्यासाठी आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, नाशिक येथे युनिट कोट्यातून १० ते १२ ऑक्टोबर २०११ अखेर सोल्जर जीडी, सोल्जर टेक्नीशियन आणि सोल्जर ट्रेडसमेन पदांसाठी सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी दि. १० ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ६ वाजता आवश्यक कागदपत्रांसह भरतीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे समक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक ०२३१/२६६५८१२ वर संपर्क साधावा असे कोल्हापुरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.