इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

आणखी बारा पोलिस स्थानके उभारण्याचा प्रस्ताव - गृहराज्यमंत्री


कोल्हापूर दि. १६ : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी १२ पोलिस स्थानके उभी करण्याचा प्रस्ताव आहे ,अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गोकूळ शिरगाव एम. आय. डी .सी. पोलिस स्थानकाचे त्यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरच्या महापौर वंदना बुचडे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार चंद्गकांत पाटील, उपमहापौर प्रकाश पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा पोलिस अधिक्षक विजयसिंह जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक संजय येनपुरे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रवींद्ग खेबुडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, (गोकूळ शिरगाव औद्योगिक वसाहतीचा विस्तार वाढत आहे, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचीही प्रगती झपाट्याने होत आहे.या पार्श्वभूमीवर येथे शांतता आणि सुव्यवस्था असायला हवी. या दृष्टीकोनातूनच पोलिस स्थानक उभारण्यात आले आहे.(
पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. शहरात सीसीटीव्ही उभारुन सुरक्षितता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गुन्हे सिध्द घेण्याचा दर वाढविण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलिस अधिक्षक विजयसिंह जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य, आणि पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी  इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.