कोल्हापूर दि. १३ : छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम १ जानेवारी २०१२ या अर्हता दिनांकावर आधारित निश्चित करण्यात आला आहे. मतदारांच्या सोयीसाठी करवीर तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत २७४ कोल्हापूर दक्षिण, २७५ करवीर व २७६ कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदार संघासाठी मदत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मतदारांना माहिती देण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून १६ ऑक्टोबर २०११ व २३ ऑक्टोबर २०११ या सुट्टीच्या विशेष मोहिमेच्या दिवसासह मतदारांना माहिती देण्यात येणार आहे असे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार करवीर यांनी कळविले आहे.
मदत नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३१-२५४८२००, २६४४३५४ असे असून विधानसभा मतदार संघनिहाय नियुक्त केलेल्या कर्मचार्यांची नावे पुढीलप्रमाणे.
२७४ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ - कक्ष प्रमुख अनिल शिंदे, बी. एस. कांबळे, दिलीप गोंधळी व संजय चाचुर्डे. २७५ करवीर विधानसभा मतदार संघ - कक्ष प्रमुख महेश शिंदे, दिलीप म्हेतर, अनंत गवळी, धनाजी दळवी. २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ - कक्ष प्रमुख प्रकाश परीट, प्रवीण पाटील, डी. एस. वारके, नारायण पाटील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.