सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

लोकशाही दिन कार्यक्रमात ११० अर्ज दाखल

     कोल्हापूर दि. १० : जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात विविध विभागांशी संबंधित एकूण ११० अर्ज दाखल झाले असून त्यापैकी सर्वांधिक ३७ अर्ज महसूल विभागाचे आहेत.
      आज दाखल झालेल्या ११० अर्जापैकी २१ अर्ज जिल्हा परिषदेशी निगडीत आहेत. त्या खालोखाल १८ अर्ज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी तर १३ अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाशी निगडीत आहेत. अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे ५ अर्ज आहेत. उपजिल्हाधिकारी मुद्गांक विभागाचे ३, साखर सहसंचालक २ अर्ज तसेच अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, विशेष समाज कल्याण अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सहाय्यक कामगार आयुक्त, युनियन बँक ऑफ महाराष्ट्र, रेसिडन्सी क्लब, जिल्हा वनसंरक्षक या विभागांशी निगडीत प्रत्येकी १ अर्ज दाखल झाला आहे. सप्टेंबर २०११ अखेर दाखल झालेल्या ११५ अर्जापैकी  ६५ अर्ज निकाली काढण्यात आले असून ५० अर्ज प्रलंबित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.