इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

२१ ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिनाचे आयोजन

         कोल्हापूर दि. १७ :  लडाख येथे २० ऑक्टोबर १९५९ रोजी केंद्गीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान हरवले होते. त्यांचा शोध घेण्याकरिता आयटीबीपी आणि केंद्गीय राखीव पोलीस दलाच्या २२ जवानांची एक तुकडी २१ ऑक्टोबर रोजी गेली होती. या तुकडीवर हॉट स्प्रिंग ठिकाणी चिनी सैनिकांनी अचानक शस्त्रानिशी जोरदार केलेल्या हल्ल्यात १० जवान मृत्यूमुखी, ५ जवान जखमी झाले तर ७ जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. चिनी सैनिकांबरोबर निकराची लढत देताना या शुरवीरांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले, तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस देशांतील विविध पोलीस दलाच्यावतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
      कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने २१ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ८ वाजता कोल्हापुरातील पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा येथे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलीस स्मृती दिन पाळण्यात येणार आहे.
पोलीस स्मृती दिनाचे दिवशी एकाचवेळी  देशातील सर्व पोलीस मुख्यालयांच्या ठिकाणी दि. १ सप्टेंबर २०१० ते ३१ ऑगस्ट २०११ या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
पोलीस स्मृतीदिन समारंभास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे पोलीस अधिक्षक विजयसिंह जाधव यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.