गुरुवार, ३ जून, २०२१

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड-19 प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधांचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सन 2021-22 साठी मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व शासकीय 20 पेक्षा अधिक बेड्स आहेत अशा इच्छुक खागी इस्पितळांनी

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEqG821O5qx7XUd8bNd78aZPtaXNaMmd-RrOypBUYBeZnE-g/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0  या लिंकवर नोंदणी करणे अनिवार्य आहे

अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या  0231-2545677 या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.