मंगळवार, १ जून, २०२१

रमाई आवास घरकूल योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या-ज्या व्यक्तींना अद्यापही स्वत:चे पक्के घर उपलब्ध झाले नाही, त्यांनी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवकांमार्फत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शहरी भागासाठी संबंधित नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सन 2021-22 करीता विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह तत्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकूल योजना (ग्रामिण व शहरी) तसेच इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना (फक्त ग्रामीण) या वैयक्तिक घरकुलाच्या योजना राबविल्या जातात.

00000

           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.