कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील
तृत्तीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारी संदर्भात तक्रार निवारण समितीची, कक्षाची
स्थापना करणे आवश्यक असल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार
तृतीयपंथीयांच्या प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार
निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे
यांनी दिली.
समितीमध्ये असलेले शासकीय सदस्य-
जिल्हाधिकारी, अध्यक्ष, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, सह अध्यक्ष, जिल्हा शल्य
चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, अन्न व नागरी
पुरवठा अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक),
जिल्हा नियोजन अधिकारी हे समितीमध्ये शासकीय सदस्य असुन जिल्हाधिकारी यांनी
नियुक्त केलेली सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती ॲड. दिलशाद इलाही मुजावर
तसेच तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थातील दोन तृतीयपंथीय व्यक्ती
यामध्ये अमृता (अमृत) यशवंत सुतार व प्रिया ऊर्फ स्वप्नील भरत सवाईराम यांची
नियुक्ती जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या
तक्रारींचे विहीत कालावधीत निवारण करणे, तक्रारीबाबत पडताळणी करुन आवश्यकतेनुसार
विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळास शिफारस करणे व समितीने
तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या अडचणींचा, समस्यांचा, तक्रारींचा सखोल अभ्यास करणे व
योग्य त्या उपाययोजना शासनास सुचविणे, आदी बाबींवर ही समिती कार्य करणार आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.