कोल्हापूर, दि.3 (जिल्हा
माहिती कार्यालय): येथील जिल्हा दूध उत्पादक संघ 'गोकुळ'च्या नवनिर्वाचित संचालक
मंडळाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज ( गुरूवार ) त्यांच्या
देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन संवाद साधला.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह
राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र
पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार
सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप
नरके, चेअरमन विश्वास नारायण पाटील, सर्वश्री संचालक डॉ. सुजित मिणचेकर, बयाजी
शेळके, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिह गायकवाड, रणजित पाटील,
अजित नरके, अभिजित तायशेटे, संभाजी पाटील, किशन चौगुले, नंदकुमार ढेंगे आदी
मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोकुळ दूध
संघाची तसेच सहकार क्षेत्राची पुढील वाटचाल आणि समस्यांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा
करण्यात आली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.