कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यात CCC आणि DCHC या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून त्या ठिकाणी पुरविण्यात
येणाऱ्या सोयी-सुविधांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी हेमंत निकम व
श्रीमती हर्षला वेदक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांना अनुक्रमे सुनिल
घाग व विनोद वस्त्रे हे या कामी मदत करतील.
या आदेशाची अंमलबजावणी न
झाल्यास दोषींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार व भा.दं. सं. 1860
(45) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.