गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

एनसीसी कॅडेट्ससाठी आयोजित ऑनलाईन कोर्स 'मदत' मध्ये राज्यातील 1000 एनसीसी कॅडेट्सचा सहभाग

 


              कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): एनसीसी कॅडेट्ससाठी  विनामूल्य आयोजित केलेल्या ऑनलाईन कोर्स 'मदत'  मध्ये राज्यातील सुमारे 1000 एनसीसी कॅडेट सामील झाल्याची माहिती कोल्हापूर मुख्यालय येथील एनसीसी कर्नल आणि मुख्य प्रशासन अधिकारी यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

                   हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट, हैदराबाद यांच्याशी सल्लामसलत करून कोल्हापूर एनसीसी ग्रुप मुख्यालय महाराष्ट्र एनसीसी संचालनालय मुंबईच्या वतीने या कोर्सचे संयोजन केले आहे.  या ऑनलाईन मुख्य उद्दीष्टे म्हणजे प्रायोगिक योग, विश्रांती चिंतन तंत्र, विचारांची शक्ती, संप्रेषण कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये, निर्णय घेण्याची कौशल्ये आणि वेळ व्यवस्थापन अशी होती.  या कोर्सचा पहिला विभाग 4 डिसेंबर 2020 रोजी संपुष्टात येणार आहे. अभ्यासक्रम तणावमुक्ती, वर्णनिर्मिती आणि सकारात्मक विचारसरणीसाठी खूप उपयुक्त होता असे मत या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सनी व्यक्त केले आहे. या कोर्सचा समारोप 4 डिसेंबर रोजी होणार असल्याचेही कोल्हापूर मुख्यालय येथील एनसीसी कर्नल आणि मुख्य प्रशासन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.