कोल्हापूर,
दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय): महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा
(MAHATET)-2019 परिक्षेमध्ये पात्र ठरलेल्या परिक्षार्थींचे प्रमाणपत्र वितरणाचे
काम 21 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले प्रमाणपत्र घेण्यासाठी
कार्यालयीन वेळेत (सुट्टी वगळून) उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या
शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे.
पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक परीक्षा प्रवेशपत्राची
प्रत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता गुणपत्रिका प्रत, डी. टी. एड उतीर्ण गुणपत्रक
किंवा प्रमाणपत्र अथवा बी. एड. उतीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, आरक्षण
प्रवर्गाचे जात/ वैधता प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार), अपंगत्वाचे प्रमाणपत्र
(आवश्यकतेनुसार), ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, निवडणूक
ओळखपत्र) इत्यादी कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या प्रती घेऊन स्वत: उपस्थित राहणे
आवश्यक आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.