इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान पदवीधरसाठी 68.09 तर शिक्षकसाठी 86.70 टक्के मतदान

 

 

 









कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.)  जिल्ह्यात आज झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान झाले. पदवीधरसाठी 68.09 तर शिक्षकसाठी 86.70 टक्के मतदान झाले. 

पदवीधर मतदार संघासाठी तालुका निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे- शाहूवाडी- पुरुष 359, स्त्री-41 एकूण 400 (86.77 टक्के). पुन्हाळा- पुरुष 691, स्त्री-180 एकूण 871 (85.39 टक्के). हातकणंगले- पुरुष 1357, स्त्री-624 एकूण 1981 (85.46 टक्के). शिरोळ- पुरुष 654, स्त्री-234 एकूण 888 (84.65 टक्के). करवीर- पुरुष 2170, स्त्री-980 एकूण 3150 (82.53 टक्के). गगनबावडा- पुरुष 87, स्त्री-12 एकूण 99 (90.83 टक्के). राधानगरी- पुरुष 392, स्त्री-46 एकूण 438 (95.01 टक्के). भुदरगड- पुरुष 382, स्त्री-84 एकूण 466 (94.52 टक्के). कागल- पुरुष 564, स्त्री-156 एकूण 720 (93.26 टक्के). गडहिंग्लज- पुरुष 598, स्त्री-162 एकूण 760 (90.37 टक्के). आजरा- पुरुष 217, स्त्री-48 एकूण 265 (93.64 टक्के). चंदगड- पुरुष 509, स्त्री-62 एकूण 571 (93.15 टक्के).

या संघासाठी एकूण मतदान केंद्रे 205, पुरुष पदवीधर मतदार-62709, स्त्री पदवीधर मतदार-26820 एकूण पदवीधर मतदार 89529, झालेले एकूण मतदान पुरुष 7980, स्त्री-2629 एकूण 10690 (86.70 टक्के).

शिक्षक मतदार संघासाठी झालेले मतदान पुढील प्रमाणे- शाहूवाडी पुरुष 1384, स्त्री-314 एकूण 1698 (62.43 टक्के). पन्हाळा पुरुष 2651, स्त्री-735 एकूण 3386 (68.32 टक्के). हातकणंगले- पुरुष 7270, स्त्री-2597 एकूण 9867 (68.08 टक्के). शिरोळ- पुरुष 5415 स्त्री-1992 एकूण 7407 (68.48 टक्के). करवीर- पुरुष 13720, स्त्री-5384 एकूण 19104 (63.06 टक्के). गगनबावडा- पुरुष 291, स्त्री-49 एकूण 340  (79.44 टक्के). राधानगरी- पुरुष 2753, स्त्री-626  एकूण 3379  (71.66 टक्के). भुदरगड- पुरुष 2055, स्त्री-630 एकूण 2685 (72.06 टक्के). कागल- पुरुष 4473, स्त्री-1396 एकूण 5869 (78.07 टक्के). गडहिंग्लज- पुरुष 2640, स्त्री-973 एकूण 3613 (73.26 टक्के). आजरा- पुरुष 1268, स्त्री-409  एकूण 1677 (72.50 टक्के). चंदगड- पुरुष 1595, स्त्री-344 एकूण 1939 (74.09 टक्के).

 या मतदार संघासाठी एकूण 76 मतदान केंद्रे, पुरुष शिक्षक मतदार-8879, स्त्री शिक्षकम मतदार-3358, एकूण शिक्षक मतदार-12237, झालेले एकूण मतदान पुरुष-45515, स्त्री 15449 एकूण 60964 (68.09 टक्के)

मतदानाची अंतिम टक्केवारी फॉर्म-16 व मतदान केंद्र अधिकारी डायरी यांचा ताळमेळ घेतल्यानंतर अधिकृत जाहीर करण्यात येईल. 

0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.