सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन -सं.कृ.माळी

 


          कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने राज्यातील उमेदवारांना विविध खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने राज्यात दि. 12 व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सं.कृ.माळी यांनी दिली.

       या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये राज्यातील अनेक खासगी उद्योजकांचा सहभाग असणार आहे. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्यांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे  आयोजन करण्यात येईल.

          इच्छुक युवक-युवतींनी पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0231-2545677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.