शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

12, 19 व 26 डिसेंबर या शासकीय सुट्टी रोजी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार - मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील

 


कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय):  शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली असल्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढलेले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये दि. 12 डिसेंबर, 19 डिसेंबर व 26 डिसेंबर या शासकीय सुट्टी दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी शासनाने दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांनी केले आहे.

सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.1, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.2, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.3, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र.4, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, इचलकरंजी क्र.1, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, इचलकरंजी क्र.2, दुय्यम निबंधक श्रेणी-1, शिरोळ, दुय्यम निबंधक श्रेणी-1, हातकणंगले, दुय्यम निबंधक श्रेणी-1,कागल, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुरगूड, दुय्यम निबंधक श्रेणी-1, भुदरगड, दुय्यम निबंधक श्रेणी-1, गडहिंग्लज, दुय्यम निबंधक श्रेणी-1, राधानगरी, दुय्यम निबंधक श्रेणी-1,पन्हाळा, दुय्यम निबंधक श्रेणी-1, शाहूवाडी ही कार्यालये सुरू राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

0000000

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.