कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत
असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरूप व शक्य असल्यास दूरचित्रवाणी
परिषदेव्दारे अथवा अर्जदारांच्या संमतीने शक्य असल्यास गुगल मीट, झूम ॲपचा वापर
करून करण्यात यावे, असे निर्देश सह सचिव महेंद्र वारभुवन यांनी दिले.
सामान्य
प्रशासन विभागाने 23 नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 26
सप्टेंबर 2012 च्या परिपत्रकानुसार तालुका स्तरावरील लोकशाही दिनासाठी तहसिलदार,
जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिनासाठी जिल्हाधिकारी /
महानगरपालिका आयुक्त, विभागीय स्तरावरील लोकशाही दिनासाठी विभागीय आयुक्त यांना
अध्यक्ष घोषित करण्यात आले आहे. यास्तव प्राप्त परिस्थितीमध्ये लोकशाही दिनाचे
आयोजन परिस्थितीनुरूप करण्यासाठी ते सक्षम आहेत. तथापि, लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील
करण्यात येत असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरूप व शक्य असल्यास
दूरचित्रवाणी परिषदेव्दारे अथवा अर्जदारांच्या संमतीने शक्य असल्यास गुगल मीट, झूम
ॲपचा वापर करू करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव कमी व
अर्जदारांना कार्यालयात बोलाविणे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या
अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन
केल्यानंतरच अर्जदारांना छोट्या संख्येच्या गटात समक्ष बोलावून लोकशाही दिनाचे
आयेाजन करण्यात यावे.
हे
शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक
202011231444142007 असा आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.