कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): कोविड -19 प्रादुर्भावाच्या परिस्थितीमध्ये क्रीडा
विभागामार्फत मानक कार्यप्रणाली (SOP) प्रसिद्ध करण्यात
आलेली आहे. यामध्ये खेळाची वैयक्तीक खेळ प्रकार, सांघिक खेळ प्रकार, प्रशिक्षण
केंद्र, स्पोर्ट क्लब्स, सराव केंद्रे, खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा संकुले यांनी पाळावयाची
खबरदारी याची माहिती https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हा
क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.
जिल्ह्यातील खेळाडूंनी, क्रीडा संघटनांनी, शाळा, महाविद्यालये, खासगी
क्रीडा संकुले, स्पोर्ट्स क्लब्स, शासकीय, निमशासकीय विभागांनी https://sports.maharashtra.gov.in/nfsshare/sports_ma/circulars/1602845494_sop_covid_19.pdf या लिंकला भेट देवून माहिती मिळवावी व त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे
अवाहनही श्री. साखरे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.