शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

महाडीबीटी प्रणालीव्दारे शिष्यवृत्ती लाभ बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): महाडीबीटी प्रणालीव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजनांचा लाभ त्यांचे आधार संलग्न बँक खात्यावर दिला जातो.  महाडीबीटी प्रणालीव्दारे शिष्यवृत्तीचा लाभ थेट बँक खातत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा. यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांनी  पाठपुरावा करून याबाबतचा अहवाल सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयास सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.

सन 2018-19 2019-20 या शैक्षणिक वर्षापासुन महाडीबीटी प्रणालीव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे आधार संलग्न बँक खातेंवर भारत सरकार शिष्यवृत्ती , शिक्षण फी परीक्षा फी योजना या योजनांचा लाभ थेट दिला जातो. ही कार्यवाही पी. एफ. एम. एस प्रणालीवरुन केली जाते. सदर प्रणालीवरुन विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयांचा लाभ अदा होणेसाठी संबंधित विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना नॉन अधार बेस रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांचे प्रोफाइलमध्ये अद्यावत केले गेलेले नाही. त्यामुळे समाज कल्याण विभागाकडून संबंधित विद्यार्थ्याला अनुज्ञेय लाभ अदा करुनही फक्त विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक अद्यावत केलेने त्यांचे खातेंवर लाभ जमा झाला नाही.

विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्याबाबत संबंधित महाविद्यालयाचे प्रतिनिधींची बैठक घेवून याबाबत सूचना देण्यात येवून महाविद्यालयांना याबाबत ईमेल व्दारे अवगत करण्यात आले आहे. मात्र अद्यापही काही विद्यार्थ्यांचे आधार संलग्न झालेले दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हयातील सर्व महाविद्यालयांना कळविण्यात येते की, याबाबत सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून याबाबतचा अहवाल सादर करावा.

0000000

                                                                                                        

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.