शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

अमृत योजनेच्या कामांमुळे शुक्रवारपेठ पोलीस चौकी ते जामदार क्लब मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने -पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे आदेश

 


          कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर शहरात केंद्रशासन पुरस्कुत अमृत योजनेअंतर्गत शुक्रवार पेठ पोलीस चौकी ते जामदार क्लब या ठिकाणी नवीन ईपलाईनचे कनेक्शन जोडण्याचे काम मे. दास ऑफशोअर इंजि. प्रा. लि. (मुंबई) ही कंपनी करीत आहे. पाईपलाईन जोडणीचे काम दि. 5 ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत रात्री 8 ते सकाळी 6 य वेळेत होणार असल्याने या मार्गावर वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक  शैलेश बलकवडे, यांनी जारी केले आहेत.

          महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अधिकारान्वये रोडवर होणारे अमृतजल योजनेचे काम नियोजीत वेळेत होण्यासाठी नमुद मार्गावर नमुदवेळेत प्रवेश बंदी करण्यात येत आहे व तेथील वाहतूक पर्यांयी मार्गाने वळविण्याबाबत आली आहे. वाहतूक नियोजनास मोटार वाहन चालक, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक  शैलेश बलकवडे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

  अमृत योजनेच्या कामामुळे पर्यायी मार्गाने करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था - 

1)      छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडून गंगावेशकडे जाणारी सर्व प्रकारची जड, अवजड व हलकी तसेच ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांना प्रवेश बंद  करण्यात येत आहे.

2)      गंगावेश कडून छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडे जाणारी सर्व प्रकारची जड, अवजड व हलकी तसेच ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांना प्रवेश बंद  करण्यात येत आहे.

3)      छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडून गंगावेशकडे जाणारे वाहने तोरस्कर चौक, सोन्या मारुती चौक, सी. पी. आर चौक, भाऊसिंगजी रोड, माळकर चौक, छत्रतपी शिवाजी पुतळा चौक ते गंगावेश या मार्गाने मार्गस्थ होतील.

4)     गंगावेश कडून छत्रतपी शिवाजी पुलाकडे जाणारी वाहने पापाची तिकटी, माळकर चौक, भाऊसिंगजी रोड, सी. पी. आर. चौक या मार्गाने मार्गस्थ होतील

5)      सर्व प्रकारची जड, अवजड व हलकी तसेच ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांच्या वाहतुकीवर दि. 5 ते 10 डिसेंबर 2020 पर्यंत दररोज रात्रौ 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध घालण्यात येत आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.