शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

स्वस्थ व तंदुरूस्त भारत संकल्पनेविषयी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे जनजागृती रॅली

 


 

कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): स्वस्थ व तंदुरूस्त भारत संकल्पनेच्या जनजागृतीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या जनजागृती रॅली काढण्यात आली.

रॅलीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून सुरू होवून संभाजीनगर, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी मार्गे बिंदू चौकापर्यंत काढण्यात आली.या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एनएसएसच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्यासंबंधीचा संदेश देण्यात आला.

प्राचार्य रविंद्र मुंडासे, उप प्राचार्य दत्ता पाठक व अनिल बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागाचे अधिकारी अमोल आंबी व उत्तम माने यांनी रॅली काढण्यासाठी परिश्रम घेतले. गट निर्देशक एस.बी.कांबळे, ए.पी.कांबळे, किरण साळुंके, महेश नरवडे, नामदेव पाटील, रंगराव संकपाळ यांचेही या उपक्रमास सहकार्य लाभले.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.