सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

मुदत संपलेल्या वाहनांचे प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन

 


           कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): लॉकडाऊन कालावधीत मुदत संपलेल्या वाहनांच्या कागदपत्रांची मुदत दिनांक 31 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. परिवहन संवर्गातील वाहनधारकांनी आपले वाहन 31 डिसेंबर पुर्वी नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांनी केले आहे.

       योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठीच्या कोट्यात देखील वाढ करण्यात आली आहे. वाढ करण्यात आलेल्या कोट्याचा जास्तीत जास्त वाहनधारकांनी लाभ घ्यावा.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.