गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

जनआरोग्य योजना; तक्रार निवारणासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


 

कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत प्राप्त तक्रारीचे निवारण करण्यासाठी  जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके व सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सरस्वती पाटील यांची नियुक्ती केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

शासनाची फ्लॅगशीप वेलफेअर स्क‍िम असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या‍ जिल्ह्यातील रुग्णालयांनी जास्तीत-जास्त प्रमाणात कोव्हिड-19 बाधित व नॉन कोव्हिड रूग्णांना या योजनेअंतर्गत नोंदणी, उपचाराचे लाभ मिळवून देणे व त्याचबरोबर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समन्वय व सहायक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422087077 व सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सरस्वती पाटील यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9226342943 असा आहे

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.